ड्रग्ज, पोर्नोग्राफी व सेक्स रॅकेट चालवणा-या काशिफ खानशी वानखेडेचे संबंध !

0
20211024_190227

ड्रग्ज, पोर्नोग्राफी व सेक्स रॅकेट चालवणा-या काशिफ खानशी वानखेडेचे संबंध !

मुंबई, दि. 29 ऑक्टोबर:
नवाब मलिक यांनी आज पुन्हा समीर वानखेडे वर हल्लाबोल करून खळबळ उडवून दिली. काशिफ खान हा फॅशन टिव्हीचा इंडिया हेड आहे. या फॅशन शोमध्ये ड्रग्ज विकले जाते. सेक्स रॅकेट चालवले जाते, त्या कशीफशी समीर वानखेडेचे संबंध आहेत, असा सणसणाटी आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

मलिक म्हणाले की, क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा आयोजक काशिफ खान होता हे त्याने सोशल मीडियावर निमंत्रण देऊन सांगितले होते. रविवारी संध्याकाळी ६.२६ वाजताचा एक व्हिडीओ त्याने त्याच्याच साईडवर अपलोड केला होता. आपल्या गर्लफ्रेंडसोबत डान्स करताना तो व्हिडीओत दिसत आहे. त्याचवेळी समीर वानखेडे याला प्रश्न केला होता की, हा दाढीवाला कोण आहे. त्या दाढीवाल्याला समीर वानखेडेने का विचारलं नाही. त्याला अटक का केली नाही. अवैध धंदे करणार्‍या या काशिफ खानसोबत समीर वानखेडेचे चांगले संबंध आहेत.

एका अधिकाऱ्याने या दाढीवाल्यावर धाड टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी समीर वानखेडेने रोखले होते असे सांगितले आहे. काशिफ खान कोण आहे याचा तपास किंवा शोध पत्रकारांनी घ्यावा. काशिफ खान हा क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा एक आयोजक होता. त्याचा सेक्स, ड्रग्ज, पोर्नोग्राफी याचे मोठे रॅकेट चालवतो परंतु त्याच्यावर कारवाई झाली नाही शिवाय १३०० लोकांची साधी चौकशीही झाली नाही. रेव्ह पार्टी होणार याची कल्पना एनसीबीला होती. आयोजकांची माहिती होती. त्याची चौकशी का झाली नाही. क्रूझवर ड्रग्जची झाडाझडती का झाली नाही. समीर वानखेडे यांचे संबंध होते म्हणून चौकशी झाली नाही का? असे अनेक सवाल करतानाच काशिफ खान याच्याकडे कुणाकुणाची पैसे आहेत याची कसून चौकशी झाली तरहे सगळं बाहेर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.

हे प्रकरण इतकं दलदलीत अडकलं आहे की, जितका शोध घेतला असता अजून काही प्रकरणे समोर येत आहेत. माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करा मी जामीन घेऊन पुन्हा माझी लढाई लढेन परंतु आता मी न्यायालयात जावे असे सांगत आहेत मग वानखेडे न्यायालयात का गेले? माझ्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधू नये. सोशल मिडियावर पोस्ट टाकू नये यावर बंदी घालावी. मात्र हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी यावर तात्काळ सुनावणी घेण्यास हरकत घेतली. निष्पाप लोकांना या देशात बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो काढून घेण्याचा डाव समीर वानखेडे याचा होता. एखाद्याला बोलण्यापासून किंवा लिहिण्यापासूनचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखं आहे. कुणालाही बोलण्या-लिहिण्यापासून रोखू शकत नाही. कुणी एखाद्याची बदनामी करत असेल तर त्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. त्या हत्याराचा वापर व्हायला हवा असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

काल समीर वानखेडे याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे त्यात त्यांनी मराठी आहोत. मराठी असल्याने सहकार्य करावे असे म्हटले आहे. मग नवाब मलिक यांचे कुटुंब ७० वर्षापासून या शहरात आहे. नवाब मलिकसुध्दा मराठी आहे. या राज्याचा नागरीक आहे मग तो महाराष्ट्राचा नाही, मराठी नाही का? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

ज्याप्रकारे एक महिन्याच्या कालावधीत रोज नवनवीन वस्तू समोर येत आहेत. समीर वानखेडेने सर्व प्रकार करुन पाहिले.पहिल्यांदा बोलला की माझ्या कुटुंबाला यात घेतलं जात आहे त्यानंतर विधान केले की आईची बदनामी केली जात आहे. मी कधीही त्याच्या आईचे नाव घेतलं ना कधी बोट दाखवलं. मी जो जन्मदाखला टाकला होता त्यामध्ये दाऊद वानखेडे त्याच्या वडिलांचे नाव आहे एवढंच बोललो होतो. बहिणीबाबत बोलताना प्लेचर पटेलने लेडी डॉन बोलल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. समीर वानखेडेच्या पहिल्या बायकोचा फोटो टाकला त्यावेळी लोकांनी प्रश्न केला हा फोटो का टाकला. मात्र तो फोटो त्यांच्या इच्छेनुसार सार्वजनिक करण्यात आला होता. समीर वानखेडेची आताची बायकोचं कधीही नाव घेतलं नाही किंवा उल्लेखही केला नाही. मला वाटतं ही लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही तर कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही तर कुणाच्या धर्मावर नाही तर माझी लढाई फर्जीवाडा करण्यात आला त्याविरोधात आहे.

आज मुंबईच्या तुरुंगात निष्पाप लोकांना अटक करुन ठेवण्यात आले आहे. त्यांना चुकीच्या पध्दतीने फसवलं गेलं आहे. स्पेशल – २६ चे पत्र दिले होते. त्यावेळी चौकशी करणार असे सांगण्यात आले. नंतर निनावी पत्राची चौकशी करता येत नाही असे सांगितले गेले. परंतु हा गंभीर विषय आहे. ज्याप्रकारे २६ प्रकरणाचा उल्लेख झाला आहे त्यावरून त्या प्रकरणाची चौकशी करावी २२ नंबर केसचा उल्लेख शेखर कांबळे या पंचाने करत वस्तुस्थिती मांडली आहे. त्यामुळे आज पुन्हा एक पत्र एनसीबीला दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करा. बोगस प्रकरणात आत असलेल्या लोकांची चौकशी करा व त्यांना न्याय द्या आणि फर्जीवाडा केलाय त्यांना शिक्षा द्या अशी मागणी त्या पत्रात केल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे हा विषय गंभीर आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यानंतर भरपूर तक्रारी आल्यावर एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे असेही नवाब मलिक म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *