समाजवादी पक्षाचे शरीफ मन्सुरी राष्ट्रवादीत !

0
20211029_110508

समाजवादी पक्षाचे शरीफ मन्सुरी राष्ट्रवादीत !

मुंबई दि. 29 ऑक्टोबर :
मालेगाव येथील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शरीफ हुसेन मन्सुरी यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्त आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व मालेगाव शहराध्यक्ष आसिफ शेख यांच्या पुढाकाराने प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.

समाजवादी पक्षाचे मालेगाव येथील पदाधिकारी साजीद मोहम्मद शफी शेख, नफीस अहमद सिराज अहमद, सय्यद जहीर सय्यद सलीम, साहील जैनुद्दीन मन्सुरी, मोहम्मद अनिस मोहम्मद युनुस, अकील शेख रफीक, नवाब हुसैन मन्सुरी, रहीम बेग नसीर बेग, अकील अहमद अब्दुल सलाम, मोहसीन मन्सुरी, शेख आमीन, आदील पठाण यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. या सर्वांचे नवाब मलिक यांनी पक्षाचे मफलर घालून पक्षात स्वागत केले. मालेगाव येथे पक्षाचा प्रभाव वाढण्याच्या दृष्टीने हा छोटेखानी प्रवेश अधिक फायदेशीर ठरेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस मुस्ताक अहमद व मालेगाव येथून आलेले अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *