क्रूझ पार्टीतील ‘त्या’ दाढीवाल्यावर वानखेडेची मेहेरनजर?
क्रूझ पार्टीतील ‘त्या’ दाढीवाल्यावर वानखेडेची मेहेरनजर
‘त्या’ दाढीवाल्यावर कुठलीही कारवाई का नाही ?
मुंबई दि. २८ ऑक्टोबर :
क्रुझवर रेव्ह पार्टी होणार होती असा दावा एनसीबीने केला होता. त्या रेव्ह पार्टीमध्ये फॅशन टिव्ही आयोजक होती आणि त्याचा हेड काशिफ खान होता त्यामुळे काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे. आजपर्यंत त्या दाढीवाल्यावर कुठलीही कारवाई का नाही याचे उत्तर समीर वानखेडे याच्याकडून अपेक्षित आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
त्या क्रुझ ड्रग्ज पार्टीत दाढीवाला असताना एनसीबीच्या नजरेतून का सुटला, की एनसीबी अधिकार्याची विशेषतः समीर वानखेडेने मेहेरनजर का दाखवली असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीला कोणतीही परवानगी नव्हती. फॅशन टिव्हीचा दाढीवाला हा व्यक्ती होता. विनापरवाना ड्रग्ज पार्टी झाली तर ते क्रूझ का सोडले. क्रुझवरील १३०० लोकांची चौकशी का केली नाही. क्रूझवर अशी पार्टी झाली तर त्या सर्व लोकांना ताब्यात का घेतले नाही असा सवाल करतानाच हे सर्व प्रकरण हे आयोजकाशी संबंधित आहे आणि आयोजक हा समीर वानखेडे याचा मित्र आहे त्यामुळेच जाणुनबुजुन बाजूला करण्यात आले आणि १३ लोकांना टार्गेट करण्यात आले व आतापर्यंत या सर्व प्रकरणाची चौकशी का गेली नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
