अटकेच्या भितीने समीर वानखेडेंची धावाधाव !
अटकेच्या भितीने समीर वानखेडेंची धावाधाव !
मुंबई, दि. २८ ऑक्टोबर :
नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अटकेच्या भितीने धावाधाव सुरु केली असून त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.
आपल्याविरोधात कठोर कारवाईपासून संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली असता न्यायालयाने वानखेडे यांना तुर्तास दिलासा दिला आहे.
आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास सीबीआयने करण्याची आणि कठोर करवाई पासून संरक्षण देण्याची मागणी वानखेडे यांनी केली होती.समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला आहे. समीन वानखेडे यांना अटक करताना ३ दिवस आधी नोटीस देण्याचा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारनेही वानखेडे यांना अटक करायची झाल्यास तीन दिवस आधी नोटीस दिली जाईल अशी हमी न्यायालयात दिली आहे.
मागील काही दिवसांपासून वानखेडे हे वादात सापडले आहेत. वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. लोकांना फसवून अटक करणे, खंडणी वसुली, पंचाकडून कोऱ्या कागदावर सह्या घेणे तसेच जातीचा खोटा दाखला देऊन नोकरी मिळवणे अस अनेक गंभीर तक्रारी आहेत. २५ कोटी रुपयांच्या लाचेप्रकरणी राज्य सरकारनेही वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरु केली आहे. अटकेच्या भीतीने वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
