नवाब मलिकांनी समीर वानखेडेंचा निकाहनामाच दाखवला !
नवाब मलिकांनी समीर वानखेडेंचा निकाहनामाच दाखवला !
मुंबई, दि. 27 ऑक्टोबर:
एनसीबीच्या समीर वानखेडेंचा आणखी बनाव उघड झाला आहे. समीर वानखेडे यांचे पहिले लग्न मुस्लिम पध्दतीने झाले त्याचा फोटो आणि नाकाहनामाच ट्वीटरवर शेअर करुन नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या आणखी एका बोगस प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
आपले लग्न स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार झाले आहे हा वानखेडे यांचा दावा यामुळे फोल ठरला आहे.
यासंदर्भात नवाब मलिक म्हणाले की, एका जाहीर सभेत बोलताना समीर वानखेडेची नोकरी जाईल आणि तो तुरुंगात असेल असे वक्तव्य केले होते. त्यावेळी मी कोणताही पोलीस यंत्रणेचा वापर केला नव्हता. समीर दाऊद वानखेडे याच्या धर्माबाबत प्रश्न उपस्थित केला नाही. माझा सवाल एकच आहे समीर दाऊद वानखेडे याने फर्जी दस्ताऐवजाच्या आधारावर अनुसूचित जातीचा दाखला बनवून IRS ची नोकरी मिळवली आणि एका गरीब दलित मुलाचा अधिकार हिरावून घेतला आहे. मी कुठल्याही धर्माची चर्चा केली नाही. समीर वानखेडेचा जो फर्जीवाडा आहे. फर्जी पध्दतीने दाखला घेतला त्या आधारावर नोकरी घेतली हा मुद्दा लावून धरल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
समीर वानखेडे यांचा जन्मदाखला अगोदर शेअर केला त्यावर हे फर्जी आहे असे बोलत होते. फर्जी आहे तर खरा दाखला कुठे आहे हे कुटुंबातील लोकांनी सांगितले पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.
आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी ट्वीटरवर एका सुंदर जोडीचा फोटो टाकला आहे. जो ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये लग्न (निकाह) केले. तो लग्नदाखलाही ट्वीटरवर शेअर केला आहे. त्या दाखल्यात दोन रकाने रिकामे करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुलीच्या वडिलांचे नाव आहे. त्यांच्या चुलत्याचे नाव आहे. तो रकाना यासाठी रिकामा ठेवण्यात आला आहे की, त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने घडत आहे. म्हणून ते दोन रकाने रिकामे आहेत. जन्मदाखल्यावर जे बोट दाखवत होते त्यांना सांगू इच्छितो की तो दाखला महानगरपालिकेच्या दस्तऐवजातील एक हिस्सा आहे.जे कागद मी शेअर करत आहे ते खरे व सरकारी दस्ताऐवज आहेत हे जबाबदारीने सांगत आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिले तर २० वर्षानंतर टेंपर करुन त्यावर स्टार बनवून वेगळया पध्दतीने नावाचा खेळ करण्यात आला आहे असेही मंत्री नवाब मलिक म्हणाले.
नवाब मलिक यांनी निकाहनामा जाहीर केला आहे. त्यात मस्जिद व मदरसा याचा पत्ता आहे. कालपर्यंत आम्ही हिंदू राहिलो आहे असे बोलत होते. मुसलमानचा प्रश्न उठवत नाही. या देशाचा कायदा सांगतो की, कुठलाही व्यक्ती धर्मांतर करत असेल तर त्याला दलित जातीचा लाभ मिळत नाही. विशेष करुन मुस्लिम व ख्रिश्चन धर्मातील सवाल आहे. कुणाला वाटत असेल की, हे चुकीचे आहे तर मोदी आहेत. देशाचं संविधान बदलावं की एखादा दलित मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात जात असेलतर लाभ मिळेल किंवा तीच पध्दत असेल तर उद्या मी सुद्धा दावा करु शकतो की माझे पूर्वज किंवा माझ्या सोबतच देशात राहणारे कोट्यवधी लोक असतील तर संघ परिवार दावा करत होते. मोहन भागवत बोलत होते सर्वांचे पूर्वज एक आहेत. हा आमचे पूर्वज या देशात शूद्र होते. समजा आम्ही पुन्हा अनुसूचित जातीतील आहोत तर या देशातील १५ कोटी मुसलमानांना हा लाभ मिळेल का? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
मी सरकारी दस्तऐवजावर बोलत आहे. कोण धर्म बदलत असेल तर मला कोणतीच आपत्ती नाही परंतु देशाचा कायदा सांगतो की, अनुसूचित जातीचा असेल आणि धर्मांतर केले तर त्याला अनुसूचित जातीचा फायदा मिळत नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
