वानखेडेसंदर्भात नवाब मलिकांचा आणखी एक धडाका
वानखेडेसंदर्भात नवाब मलिकांचा आणखी एक धडाका.
मुंबई दि. २५ ऑक्टोबर :
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे आणखी गोत्यात आले आहेत. नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्याबद्दल आणखी एक धडाका करून वानखेडे यांचा खोटेपणा उजेडात आणला आहे. नव्या गौप्यस्फोटामुळे वानखेडे यांची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.
‘पहचान कौन’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर दाऊद वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे.तर ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असं म्हणत दुसरं ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर करुन फर्जीवाडयाची पोलखोल केली आहे.
ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे. मुस्लिम असताना मागासवर्गीय असल्याचे खोटे प्रमाणपत्र UPSC परीक्षेसाठी दिले असा दावा मलिक यांनी केला आहे.
एनसीबीच्या बोगस कारवाया व आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडेच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय हेही पत्रकार परिषद घेत समोर आणले होते.
