नगर जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते काँग्रेसमध्ये

0
IMG-20211018-WA0060

नगर जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते काँग्रेसमध्ये

मुंबई. दि. 19 ऑक्टोबर :
काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात सुरु असून नगर जिल्ह्यातील भाजपा, समाजवादी पक्ष व वंचितच्या नेत्यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात
अहमदनगर शहर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे माजी अध्यक्ष जुबेर बाबामिया सय्यद, समाजवादी पार्टीचे शहर संघटक शेख मोहम्मद हनीफ जहागीरदार, पद्मशाली समाजाचे नेते नारायण विश्वनाथ कोडम, भारिप बहुजन महासंघाचे भिंगारचे माजी शहराध्यक्ष सागर दत्तात्रेय चाबुकस्वार यांचा समावेश आहे.

काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षासारख्या पोकळ घोषणा देणारा पक्ष नसून खऱ्या अर्थाने सबका साथ देणारा पक्ष असल्यानेच काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व जाती धर्माला योग्य प्रतिनिधित्व देण्याचे काम काँग्रेसमध्ये केले जाते. सर्वांच्या विकासाठी झ़टणारा काँग्रेस पक्ष हाच देशात व राज्यात सक्षम पर्याय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशात मागील काही वर्षापासून धर्माच्या नावावर राजकारण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. लोकशाही, संविधान यांना संपवण्याचे कारस्थान रचले जात आहे. परंतु भारत हा लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्वावर चालणारा देश आहे. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी मिळून राज्यात एक भक्कम पर्याय उभा केला आहे. दोन वर्षात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अनेक संकटांचा सामना करत विविध कल्याणकारी योजना राबविल्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, अतिवृष्टी, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीपोटी भरपाई दिली, कोरोना संकटावर चांगल्या प्रकारे मात केली. मविआ सरकार लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले आहे म्हणूनच विधान परिषद निवडणुका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत मविआला जनतेने मोठा प्रतिसाद दिला, असे थोरात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *