कोल इंडियाच्या गलथान कारभारामुळे कोळसा संकट !

0
20211017_180940

कोल इंडियाच्या गलथान कारभारामुळे कोळसा संकट !

कृत्रिम टंचाई दाखवून खाजगी वीज कंपन्यांकडून लूट.

मुंबई, दि. 17 ऑक्टोबर

देशाला अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप हे कोल इंडियाच्या गलथान कारभारामुळेच झाले असल्याचे आता उजेडात आले आहे. कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही वीज निर्मिती व पुरवठा करण्यात कोल इंडिया फेल झाला आहे, हे कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार जैन यांनी कोल इंडियाला पाठवलेल्या २७ सप्टेंबर २०२१ च्या पत्रातून स्पष्ट होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिली.

राजेश शर्मा पुढे म्हणाले की, कोल इंडियाकडे ४४ मिलीयन टन एवढा मुबलक कोळसा साठा असतानाही कोळसा टंचाई असल्याचे कृत्रिम चित्र निर्माण करण्यात आले. अदानी, जिंदाल, जेपी ग्रुप या खाजगी वीज कंपन्यांना मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध होऊ शकला व ४-६ रुपये प्रति युनिट असा वीजेचा दर असताना या कंपन्यांची १७ रुपये प्रती युनिट प्रमाणे वीज विकून बेकायदेशीपणे अफाट नफा कमावला व मालामाल झाले.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली ७ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या औष्णीक ऊर्जा निर्मीती संदर्भातील बैठकीत कोळसा टंचाईची तक्रार केलेली दिसत नाही. एकूणच कृत्रिम कोळसा टंचाई दाखवून देशाला वेठीस धरण्याचे काम केले गेले. पुरेसा कोळसा उपलब्ध असतानाही वीज कंपन्यांनी वीजेचा पुरेसा पुरवठा केला नाही. याची जबाबदारी कोणताचा सरकारी विभाग घेत नसून एकमेकावर जबाबदारी ढकलत आहेत, असेही शर्मा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *