राज्य सरकार स्वतःच बंद कसा पुकारू शकते ?
राज्य सरकार स्वतःच बंद कसा पुकारू शकते ?
मुंबई दि. 10 ऑक्टोबर:
महाविकास आघाडी विरोधाला विरोध करण्याच्या राजकारणात इतके मश्गुल आहे की त्यांना भान राहिलेले नाही के ते राज्यात सरकार चालवीत आहेत. राज्य सरकार स्वतःच राज्यात बंद कसा पुकारू शकतात? सरकारने बंद पुकारने ही महाविकास आघाडीची चुकीची भुमीका आहे, त्याचा त्यांनी पुनर्विचार करावा असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
लखीमपूर खेरी मधील हिंसाचाराचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे. लखीमपूर खेरीतील प्रकार निषेधार्ह , दुःखद आणि मनाला चटका लावणारा आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी एसआयटी मार्फत चौकशी सुरू केली असून या प्रकरणी कोणीही दोषी असो त्यावर कठोर कारवाई निश्चित होईल. केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.
शेतकऱ्यांचे नेते नवीन कृषी कायद्यांबाबत चुकीच्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकार नवीन कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना हवे ते बदल करण्यास तयार आहेत. मात्र कायदेच रद्द करा अशी आडमुठी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायद्यांबाबत सुचनांचे स्वागत करून कायद्यात सुधारणा करण्यास तयार आहे. त्यामुळे लोकशाहीत सर्वच प्रश्न आंदोलन करून सोडवताना काही प्रश्न चर्चा करून ही सोडविले पाहिजेत. लोकशाहित आंदोलन करणे योग्य मात्र शेतकरी नेते ज्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत तो आंदोलनाचा अतिरेक आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.
राज्य सरकारच्या सत्तारूढ पक्षांनीच महाराष्ट्र बंदची हाक देणे चूक आहे असे रामदास आठवले म्हणाले.
