शाहरुखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणी अटक

0
20211004_142828

शाहरुखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणी अटक

मुंबई, दि. ४ ऑक्टोबर :
बॉलिवूडला हादरा देणारी एक घटना उघड झाली असून बॉलिवूडचा बादशहा म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे. कॉर्डेलिया क्रूझवर पार्टी होत असल्याची खबर मिळाल्याने एनसीबीने छापा टाकला होता. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

आर्यनला अटक केल्यानंतर त्याची रात्र एनसीबीच्या कोठडीतच गेली. आज सोमवारी आर्यनसह अटक केलल्या आठही जणांची वैद्यकीय चाचणी केली जाईल व त्यानंतर कोर्टात हजर केले जाणार आहे. आर्यनने ड्रग्ज सेवन करण्यासाठी सोबत नेल्याची कबुली एनसीबी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे ड्रग्ज सेवन आणि बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
समुद्रात तीन दिवस चालणाऱ्या या पार्टीसाठी ६० हजारापासून 5 लाखापर्यंत फी ठेवण्यात आली होती. या छापेमारीत एनसीबीने 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन, 25 एमडीएमए ड्रग्जच्या गोळ्या आणि 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.

मला या पार्टीत केवळ पाहुणा म्हणून बोलावले होते. मी या पार्टीत सहभागी होण्यासाठी पैसे भरले नव्हते. ऑर्गनायजरने माझ्या नावाचा वापर करून लोकांना पार्टीत बोलावलं होतं असा दावा आर्यनने केला असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *