स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घवघवीत यश प्राप्त करा

0
IMG-20211002-WA0058

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घवघवीत यश प्राप्त करा

नाशिक, दि. २ ऑक्टोबर :
प्रत्येक ठिकाणी आपली शक्ती उभी करायची आहे. आपण स्वतःची ताकद उभी करा ज्यामुळे आपण आपल्या ताकदीवर निवडून येऊ. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदा या आमदारकीचा पाया आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घवघवीत यश प्राप्त करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात संवाद यात्रेच्या नाशिक कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इगतपुरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे.

इगतपुरी विधानसभा आणि नाशिक ग्रामीण मतदार संघाचा आढावा जयंत पाटील यांनी नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये घेतला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी आपले विचार मांडले.

या संवाद यात्रेला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, पक्षाचे कोषाध्यक्ष व माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी खासदार देविदास पिंगळे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, माजी आमदार जयवंत जाधव, शहर जिल्हाध्यक्ष रंजन ठाकरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शेफाली भुजबळ, अर्जुन टिळे, आमदार नितीन पवार, माजी आमदार शिवराम झोले, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, शहराध्यक्ष अंबादास खैरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *