माथाडी कामगारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
IMG-20211001-WA0044

माथाडी कामगारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई दि. 01 ऑक्टोबर:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या अनेक सदस्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांच्या शिफारसीने हा प्रवेश करण्यात आला. यावेळी संस्थापक सरचिटणीस दिनकरराव पाटील, अध्यक्ष डी. एस. शिंदे, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत रामिष्टे, उपाध्यक्ष संभाजी कोळेकर, उपाध्यक्ष आर. एस. पवार, उपाध्यक्ष सुरेश कोळेकर, सेक्रेटरी गंगाधर खिलारे, सेक्रेटरी दाजी यादव, सेक्रेटरी सुर्यकांत कुराडे यांनी जाहीररित्या पक्षात प्रवेश केला.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *