धनंजय मुंडे परळीचा बारामतीसारखा विकास करतील

0
IMG-20210928-WA0001

धनंजय मुंडे परळीचा बारामतीसारखा विकास करतील

परळी दि. 28 सप्टेंबर :
धनंजय मुंडे हे अत्यंत प्रतिभावान नेते आहेत, पुढील काळात परळी मतदारसंघासह राज्यभरात त्यांच्या हातून मोठे विकासकार्य होणे अपेक्षित आहे. येत्या काही वर्षात परळी मतदारसंघाचा त्यांच्या हातून बारामतीसारखा विकास होईल, त्यासाठी परळीकरांनी कायम पाठीशी राहून आपल्या धनुभाऊंना पाठबळ द्यावं असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्वात ही यात्रा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात आली असता जयंत पाटील यांनी परळी मतदारसंघात बैठक घेतली, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या बैठकीचे मेळाव्यात रूपांतर झाले आहे असे जयंत पाटील म्हणाले.

 

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा उल्लेख करत बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच राज्यसरकार प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत करणार असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडे प्रथम मंत्री झाल्यानंतर परळीकरांनी ज्या जल्लोषात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले होते, अगदी त्याच जल्लोष व धो धो पडत असलेल्या पावसात प्रचंड उत्साहात परळी मतदारसंघातील प्रत्येक गावात व शहरातील रस्त्यांवर जागोजागी जयंत पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. “माझ्या लग्नात एवढी मोठी वरात कोणी माझी काढली नव्हती” अशी टिप्पणी करत जयंत पाटलांनी परळीतील कार्यकर्त्यांचे आभार मानले.

यावेळी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी परिपूर्ण असून इथे आढावा घेण्याची गरजच नाही, इथे पक्ष संघटना अगदी परिपूर्ण आहे. पक्षाच्या आढावा बैठकीच्या बाबतीत धनुभाऊ आणि त्यांची टीम ‘पास’ झाली, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मोठा होणाऱ्या प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या टीका करून त्याची उंची कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. आमच्या धनुभाऊंवर देखील असेच आरोप करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु मी कायम त्यांच्या पाठीशी आहे. माझं त्यांच्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम आहे व ते कायम राहील, असे म्हणत जयंत पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *