दागिने हाॅलमार्किंग सेंटर्सचा 28 सप्टेंबरला बंद
दागिने हाॅलमार्किंग सेंटर्सचा 28 सप्टेंबरला बंद.
केंद्र सरकारच्या जाचक नियमांना हाॅलमार्किंग सेंटर्सचा
विरोध.
मुंबई, दि. 28 सप्टेंबर:
केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या नियमांनुसार दागिने निर्माता स्तरावर हाॅलमार्किंग करावे लागत आहे. अशा प्रकारची निर्मिती केंद्र देशात फक्त दहा ते पंधरा ठिकाणीच आहेत. या अशा प्रकारच्या असुविधेमुळे नवीन निर्देशांची पुर्तता करणारी केंद्रं देशभरात हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असल्याकारणाने इतर हाॅलमार्किंग सेंटर्सना काम नसल्याने देशभरातील असंख्य हाॅलमार्किंग सेंटर्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सर्व छोट्या हाॅलमार्किंग सेंटर्सच्या मागण्यांचा, अडचणींचा व तक्रारींचा विचार व्हावा या उद्देशाने 28 सप्टेंबर रोजी सर्व हाॅलमार्किंग सेंटर्स एक दिवसाचा संप करणार आहेत अशी माहिती सुवर्णकार समन्वयक समिती, मुंबईचे अध्यक्ष राजाराम देशमुख यांनी दिली आहे.
हाॅलमार्किंग कृती समिती सदस्यांच्या मतानुसार….
दागिने निर्माता स्तरावर हाॅलमार्किंग होत असल्या कारणाने रिटेल स्तरावरील दागिने विक्रेता दुकानदार दागिन्यांच्या शुद्धतेच्या जबाबदारीतून जवळपास मुक्तच झाल्यात जमा आहे. दागिने खरेदी करणा-या सर्व सामान्य ग्राहकांना आगामी काळात ह्याचा फटका बसण्याची किंवा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्राहकांना कोणत्याही गुणवत्ता संबंधीत तक्रारींचे निवारण करण्याची रिटेल स्तरावरील दागिने विक्रेते जबाबदार नसल्यामुळे सर्व सामान्य ग्राहकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी थेट पर्याय उपलब्ध नाही.
एच.यु.आय.डी.प्रक्रियेत हाॅलमार्किंग सेंटर्सनां सध्याच्या हाॅलमार्किंग शुल्कात काम करणं खूपच कठीण झाले आहे कारण ह्या नवीन निर्देश व प्रक्रियेमूळे देशभरातील असंख्य छोट्या मोठ्या हाॅलमार्किंग सेंटर्सवर अतिरिक्त यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा भार वाढला आहे.
