मंदिरासह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी

0
20210404_205948

मंदिरासह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पासून प्रार्थनास्थळे खुली

मुंबई, दि. 24 सप्टेंबर:
राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी काही राजकीय पक्ष व संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर मंदिराचे दरवाजे उघडण्याचा मुहूर्त ठरला असून
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेऊन भक्तांसाठी दिलासा दिला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याचबाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत.सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

धार्मिकस्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे.चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे.धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *