‘त्या’ बलात्का-यावर कडक कारवाई करा !

0
IMG_20210615_222557

‘त्या’ बलात्का-यावर कडक कारवाई करा !

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची पुणे पोलीस आयुक्तांना सूचना

पुणे दि.०९ सप्टेंबर :
गौरीचे आगमन सर्वांच्या घरात होत आहे तर दुसरीकडे काही दिवसांपासून पुण्यात मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत एका रिक्षा चालकाने ६ वर्षाच्या मुलीला उचलून घेऊन तिच्यावर अत्याचार केला असल्याचे समोर आले आहे. या घटनेची महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती निलम गो-हे यांनी गंभीर दखल घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची सूचना पोलीस प्रशासनास केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी स्त्री आधार केंद्राच्या प्रतिनिधी अश्विनी शिंदे यांना पाठवून पीडित कुटुंबाची विचारपूस केली. यात धक्कादायक बाब समोर आली आहे की, या मुलींवर पूर्वी देखील अशीच घटना घडली असल्याची माहिती पीडित मुलीच्या आईने सांगितली. या गोष्टीची शहानिशा करून माहिती सादर करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी बंडगार्डन पोलीस यांना केली आहे. तसेच सदरील घटनेत या रिक्षा चालकाचा कोणी साथीदार आहे का? हे देखील पाहण्याची सूचना केली आहे.

पुणे स्टेशन परिसरात मोठ्याप्रमाणात रिक्षा चालक आणि पुणे मुंबई खाजगी वाहतूक करणाऱ्या गाड्या आणि चालकांची मोठी वर्दळ असते त्यामुळे अयोग्य पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकवर कारवाई करण्याचे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी बंडगार्डन पोलिसांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *