आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरे उघडू का ?

0
20210907_190043

आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरे उघडू का ?

मुंबई, दि. ७ सप्टेंबर

राज्यातील मंदिरं उघडा या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला अप्रत्यक्षरित्या सुनावले. कोरोनाकाळात मंदिरं बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत त्याला हरकत नाही पण आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे कि मंदिराची, आरोग्य केंद्रे बंद करुन मंदिरं उघडू का, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लावला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे नेते एका व्यासपीठावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संधी साधली.

मुख्यमंत्री पुढे म्हणावे की, आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत. आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम देतो, द्यायला चांगल्या आहेत. आम्हीही त्या घोषणा दिलेल्या आहेत. घोषणेच्या पुढे जात आम्ही हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. हे ९२-९३ साली दाखवून दिलेलं आहे.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात भिवंडीतील बंद पडलेल्या आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीचा संदर्भ पकडत त्यांनी भाजपा नेत्यांना अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *