आधी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण…!

0
IMG-20210828-WA0017

आधी शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण…!

मुंबई दि. २ सप्टेंबर :

कोरोनामुळे दिड वर्षांपासून शाळा बंद असून आता शाळा सुरू करा अशी मागणी काहीजण करत आहेत. दिल्ली व काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात शाळा कधी सुरू करणार यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला आहे. आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले.

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *