सोमय्यांनी ज्योतिषाचा धंदा सुरू करावा !

0
20201112_233324

सोमय्यांनी ज्योतिषाचा धंदा सुरू करावा !

मुंबई दि. 26 ऑगस्ट :
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व कुटुंबावर किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे आरोप केले असून या आरोपाचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

अल जेब्रिया कोर्ट संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत आरोप केला आहे. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

भाजप नेते वारंवार असे बेछूट आरोप करुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावे परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचे कटकारस्थान ताबडतोब थांबवावे असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *