काॅलेजच्या प्रवेश पुस्तिकेत लैंगिक छळविरोधी माहिती अनिवार्य
काॅलेजच्या प्रवेश पुस्तिकेत लैंगिक छळविरोधी माहिती अनिवार्य
महिला व बालविकास मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय.
मुंबई, दि. 25 ऑगस्ट:
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाला आळा बसावा, तसेच याबाबत योग्य जनजागृती व्हावी यासाठी आता महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती करण्याचा महत्त्वाचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
महिलांचा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाच्या घटना वारंवार समोर येत आहेत मात्र कित्येकदा महिला अशा लैंगिक छळाच्या घटना घटनांची तक्रार करताना दिसत नाहीत महिलांचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण होत राहते मात्र त्याविरोधात समोर येऊन आवाज उठवण्यास महिला कचरत असल्याचे चित्र अनेकदा दिसते वास्तविक कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध,मनाई आणि निवारण कायदा 2013 हा लागू करण्यात आला आहे या कायद्यानुसार महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण देण्यात आले आहे मात्र असे असले तरी महिला या कायद्याचा योग्य वापर करताना दिसत नाहीत म्हणूनच आता महाविद्यालयीन स्तरावर जनजागृती केल्यास कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाला आळा बसेल असा विश्वास महिला आणि बालविकास विभागाला वाटतो त्याच दृष्टीने विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेश पुस्तिकेत अथवा महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा 2013 याची विस्तृत माहिती दिली जाणार आहे महाविद्यालयांनी आपल्या प्रवेश पुस्तिकेत अथवा संकेतस्थळावर या कायद्याची माहिती देणे 2021- 22 पासून अनिवार्य करण्यात आले आहे . या जनजागृतीमुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाच्या घटनांना आळा बसेल असा विश्वास एडवोकेट ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
