स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान मोठे !
स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान मोठे !
मुंबई, नांदेड, दि. 25 ऑगस्ट
देशाला मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून ते मोठ्या कष्टाने मिळाले आहे, अनेकांनी त्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्यचळवळीत काँग्रेस पक्षाचा मोठा सहभाग राहिला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवणारे राज्य असून स्वातंत्र्य चळवळीतही ‘भारत छोडो’सह अनेक महत्वाच्या आंदोलनाची पायाभरणी महाराष्ट्रात झाली. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राने मोठे योगदान दिले आहे, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने सुरु असलेले ‘व्यर्थ न हो बलिदान’ चलो बचाये संविधान’, हे अभियान आज नांदेडमध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमात पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे व चंद्रकांत हंडोरे, माजीमंत्री डी. पी. सावंत, नांदेड शहर अध्यक्ष आमदार अमर राजूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, संपतकुमार, प्रदेश सरचिटणीस व ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाचे समन्वयक विनायक देशमुख व अभय छाजेड, नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव नागेली आदी उपस्थित होते.
