दुष्काळग्रस्त सांगली, सोलापूरसाठी जलसंपदा विभागाचे महत्त्वाचे पाऊल

0
IMG_20210815_142347

दुष्काळग्रस्त सांगली, सोलापूरसाठी जलसंपदा विभागाचे महत्त्वाचे पाऊल.

सांगली दि. 16 ऑगस्ट :
सांगली जिल्ह्याला पुढील काळात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासन सर्व शक्य त्या गोष्टी करत असून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच याबाबतची पावले टाकल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करुन दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने सांगली व सोलापूरकरांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

सांगली जिल्ह्यातील टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज, जत, मंगळवेढा, सांगोला या तालुक्याना कृष्णा नदीतील चालू पावसाळी हंगामातील अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळी भागात दिले जाणार आहे. हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पुढील काळात उपयुक्त ठरणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

टेंभू योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला या तालुक्यासाठी १.५ टीएमसी पाणी उचलण्यात येणार असून साधारणतः ७४ लघु प्रकल्प भरले जाणार आहेत. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यासाठी अंदाजे २ टीएमसी पाणी उचलण्यात येणार असून साधारणतः १५० लघु प्रकल्प व साठवण तलाव भरले जाणार आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच याबाबतचे पावले टाकल्याने व्यक्तीशः आनंद होत असल्याचे सांगताना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *