राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा !

0
20210813_130012

राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा !

मुंबई दि. १३ ऑगस्ट :
राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस राजकारणात आल्यानंतर जाती जातीमध्ये तणाव निर्माण झाला असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते त्या वक्तव्याला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे असेही नवाब मलिक म्हणाले. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे असा उपरोधिक टोला लगावतानाच राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *