५५ वर्षाच्या करिअरमध्ये असे कधी पाहिले नाही!

0
20210812_155701

५५ वर्षाच्या करिअरमध्ये असे कधी पाहिले नाही.

नवी दिल्ली, दि. १२ ऑगस्ट :
राज्यसभेत महिला खासदारांशी मार्शल्सनी गैरवर्तन करत धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. सरकारने मात्र विरोधकांनीच सभागृहातील मार्शल्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

राज्यसभेतील घटनेवर संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले की, संसदेतील माझ्या ५५ वर्षांच्या करिअरमध्ये महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला तसे कधीच पाहिलेले नाही. सभागृहात बाहेरुन ४० पुरुष आणि महिलांना आणण्यात आले. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. सभागृहात हे योग्य झालं नाही.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला विरोधी पक्षांनी जेरीस आणले. पॅगेसस हेरगिगी, तीन कृषी कायदे यासह इतर मुद्द्यांवर सरकारची नाकेबंदी करण्यात विरोधी पक्षांना यश आले. विरोधी पक्ष कामकाज चालु देत नाहीत हे लक्षात घेऊन अधिवेशन संस्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *