मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच !
मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच !
मुंबई, दि. १० ऑगस्ट २०२१
महाराष्ट्र राज्याचा कारभार ज्या इमारतीमधून चालतो त्या मुंबईतील कडेकोट बंदोबस्त असलेल्या मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणे हे एक दिव्य कामच आहे. सर्वप्रकारच्या तपासण्या करून, खिसे, पिशव्या तपासून मंत्रालयात प्रवेश दिला जात असतो. असे असताना इतक्या मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा?
मुंबईतील मंत्रालयाला अत्यंत कडेकोड बंदोबस्त असतो, सहजासहजी कोणालाच या इमारतीत परवानगी मिळत नाही असे असताना दारुच्या बाटल्या मंत्रालयात आढलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात. मंत्रालयात तळीराम कोण आहेत? मंत्रालयात दारुच्या बाटल्या येत असल्याची कोणालाच कशी माहिती मिळाली नाही? मंत्रालयात दारुच्या बाटल्या मिळाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आपली अब्रु वेशीवर लटकल्याचे दिसताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि अर्ध्या तासात त्या दारुच्या बाटल्या हटवण्याचे काम सुरु झाले. आता सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी मुळात एवढ्या दारुच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? हा प्रश्न महत्वाचा आहे.
