पूरग्रस्त भागात रिपोर्टिंग केलेल्या पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर
पूरग्रस्त भागात रिपोर्टिंग केलेल्या पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर
सांगली दि. 9 ऑगस्ट:
पूरग्रस्त भागात जीव धोक्यात घालून रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी सांगलीत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. सांगली काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेनेचे सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आरोग्य शिबिराचे उदघाटन केले.
डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशन तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, सेवासदन लाईफ लाईन, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटना आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघटना यांच्या संयुक्तपणे हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
डॉ.जे. बी. भोर ( सर ) ठाणे यांच्या नेतृत्वाखालील डॉ. आशिष बचे, डॉ. विनोद वाकडे, डॉ. मुर्सळ सर यांचे वैद्यकीय सेवासदन मधील डॉ. सिमरन मुजावर, डॉ. प्रथमेश इंगळे आणि विद्या पवार यांच्या पथकाने पत्रकारांची आरोग्य तपासणी केली. यात प्रामुख्याने पूरग्रस्त भागात रिपोर्टिंग केलेल्या पत्रकार बांधवाना TT धनुर्वात इंजेक्शन देण्यात आले.
लेप्टोस्पायरोसिसचा धोका उद्भवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून Doxycycline औषधे वाटप करण्यात आली. रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या पत्रकार बांधवाना Amdipine आणि Glycomate/ Metmorphin औषधे वाटप करण्यात आली. रक्ताची तपासणी ( मधुमेह ) आणि ECG तपासणी करण्यात आली. सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या “पत्रकार भवन”मध्ये हे आरोग्य शिबीर घेण्यात आले.
