डॉ.आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढवणार
डॉ.आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढवणार.
मुंबई, दि. 20 जुलै:
अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना नाममात्र दरात वीज जोडणी देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या विषयावर झालेल्या बैठकीत दिले.
या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (वित्त) रविंद्र सावंत, महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर उपस्थित होते.
गरजूंना नाममात्र अनामत रक्कम जमा करून वीज जोडणी देणारी ही योजना केवळ दोन समाजापुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक करायला हवी. यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करा,” असे निर्देश डॉ. राऊत यांनी सर्व संबंधितांना दिले.
